शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचा ‘से नो टोबॅको’ उपक्रम

By admin | Updated: September 29, 2016 01:16 IST

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘से नो टोबॅको’ हा उपक्रम राबविला.

यवतमाळ : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘से नो टोबॅको’ हा उपक्रम राबविला. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एलआयसीच्या स्थानिक एलआयसी चौकातील कार्यालयाला भेट देऊन तंबाखूचे दुष्परिणाम सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. ‘डिझायर फॉर चेंज’ या सामाजिक संस्थेच्या प्रकल्पांतर्गत या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. आठवीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी चार जणांचे तीन समूह करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भेटीप्रसंगी तंबाखूच्या दुष्परिणामावर श्रेया पंडित हिने कविता सादर केली. प्रणव हिंडोचा, हर्ष ठाकरे, प्रथम मानकर, गौरी ठाकरे, राशी अग्रवाल, जित राऊत, दृष्टी दोशी, श्रृती भेंडारकर, सेजल बुधलाणी, कशीश जेठवाणी, दिया माकसाना, श्रेया पंडित, तन्वी कुडे, तन्मया काळे आदी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. पोस्टर आणि स्लोगनच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. या विद्यार्थ्यांना उमाकांत रोडे, श्रृती जोशी, साक्षी नागवाणी, राखी दीक्षित, अभिषेक गुजर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जेडीआयईटीमध्ये प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, तर एलआयसीमध्ये शाखा व्यवस्थापक उरकुडे आदींचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, पर्यवेक्षक रुक्साना बॉम्बेवाला, समन्वयक अमोल चन्नुरवार यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)