‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचा ‘से नो टोबॅको’ उपक्रम
By Admin | Updated: September 29, 2016 01:16 IST2016-09-29T01:16:37+5:302016-09-29T01:16:37+5:30
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘से नो टोबॅको’ हा उपक्रम राबविला.

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचा ‘से नो टोबॅको’ उपक्रम
यवतमाळ : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘से नो टोबॅको’ हा उपक्रम राबविला. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एलआयसीच्या स्थानिक एलआयसी चौकातील कार्यालयाला भेट देऊन तंबाखूचे दुष्परिणाम सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. ‘डिझायर फॉर चेंज’ या सामाजिक संस्थेच्या प्रकल्पांतर्गत या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. आठवीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी चार जणांचे तीन समूह करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भेटीप्रसंगी तंबाखूच्या दुष्परिणामावर श्रेया पंडित हिने कविता सादर केली. प्रणव हिंडोचा, हर्ष ठाकरे, प्रथम मानकर, गौरी ठाकरे, राशी अग्रवाल, जित राऊत, दृष्टी दोशी, श्रृती भेंडारकर, सेजल बुधलाणी, कशीश जेठवाणी, दिया माकसाना, श्रेया पंडित, तन्वी कुडे, तन्मया काळे आदी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. पोस्टर आणि स्लोगनच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली.
या विद्यार्थ्यांना उमाकांत रोडे, श्रृती जोशी, साक्षी नागवाणी, राखी दीक्षित, अभिषेक गुजर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जेडीआयईटीमध्ये प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, तर एलआयसीमध्ये शाखा व्यवस्थापक उरकुडे आदींचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, पर्यवेक्षक रुक्साना बॉम्बेवाला, समन्वयक अमोल चन्नुरवार यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)