शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच राहिला नाही, मास्क कशाला वापरायचा? कारवाईची भीतीही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लाॅकडाऊन खुले करण्यात आले. लाॅकडाऊन खुले झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार पूर्ववत होत आहे. याच सुमारास तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापरच सोडून दिला आहे. ‘लोकमत’ने शहरातील बहुतांश भागांचे सर्वेक्षण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

कोरोनाची लाट ओसरली, अन् कारवाईही संपलीकोरोनाची पहिली लाट आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला घाबरून मास्क वापरणे सुरू केले होते. यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आता कोरोनाची लाट ओसरली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नगर परिषद, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी कारवाई करणे टाळले आहे. विनाकारणच रोष नको म्हणून कारवाई थंड बस्त्यात आहे.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात

आज बाजाराचा दिवस होता. खेड्यापासून शहरातील मंडळीही भाजी खरेदीसाठी आली होती. मात्र, या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतक्याच व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता.

 दत्त चाैक 

शहरातील सर्वाधिक गजबजलेला चाैक म्हणून दत्त चाैक ओळखला जातो. याठिकाणी प्रत्येकजण येतो. मात्र, विक्रेत्यांपासून खरेदीदारापर्यंत अनेकांच्या तोंडावर मास्क दिसतच नाही.

 आर्णी नाका 

नव्याने गजबजलेली बाजारपेठ या मार्गावर पाहायला मिळते. मोठमोठी दुकाने आणि हाॅटेल्स याच मार्गावर आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी बहुतांश नागरिक विनामास्क वावरताना पाहायला मिळतात.

मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?

प्रशासनाकडून मास्क नसणाऱ्या नागरिकांवर कारवाईच होत नाही. मग, आपण मास्क वापरायचे कशाला? या कारणाने अनेकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. यातून धोका वाढला आहे.- जीवन बोरकर

आपण लस घेतली, अनेकांनी लस घेतली. आता कोरोनाची काळजीच नाही. नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. शहर आणि खेड्यात सारखी स्थिती आहे.- अंगद पोपटकर

मास्क वापरला तर पार्लरची केलेली तयारी दिसत नाही. याशिवाय चांगले कपडे परिधान केल्यावर मॅचिंग मास्कही नसतो. यामुळे बहुतांश मुली, महिला मास्क वापरणे टाळत आहे.- प्रियंका बिडकर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या