पुसदच्या महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:56+5:302021-03-18T04:41:56+5:30
पुसद : स्थानिक फु.ना. महाविद्यालयाचा ‘कल्पना वार्षिकांक’ या वर्षी संपूर्ण अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातून ग्रामीण विभागातून प्रथम आला. महाविद्यालयाचे कार्यकारी ...

पुसदच्या महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
पुसद : स्थानिक फु.ना. महाविद्यालयाचा ‘कल्पना वार्षिकांक’ या वर्षी संपूर्ण अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातून ग्रामीण विभागातून प्रथम आला.
महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. अरुण पाटील, उपप्राचार्य डाॅ. अनिल मुडे यांनी सहकार्य केले. सर्व संपादकीय चमू समन्वयक प्रा.डाॅ. प्रल्हाद वावरे, डाॅ. पाढेण, डाॅ. गोपाल शेळकीकर, डाॅ. वाटोडे, डाॅ. संजय भोयर, डाॅ. आनंद वडवले, प्रा. अंजली प्रतापवार, उर्दूसाठी डाॅ. नूर खान तसेच सहकारी विलास वायकोस यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे महाविद्यालयाला हा सन्मान प्राप्त झाला. यामुळे प्राचार्य डाॅ. पाटील, उपप्राचार्य डाॅ. मुडे व सर्व डीन, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, सर्व संचालक मंडळानेसुद्धा महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या साहित्य कलागुणांना वाहिलेला व गेल्या ३५ वर्षांपासून नित्यनेमाने प्रकाशित होणारा व विद्यापीठस्तरीय पातळीवर जाणारा हा वार्षिकांक आहे.