नितीन राऊत ‘हनुमान श्री’

By Admin | Updated: May 7, 2016 02:32 IST2016-05-07T02:32:05+5:302016-05-07T02:32:05+5:30

शिवनेरी सोसायटीतील फिटनेस सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नितीन राऊत हा ‘हनुमान श्री - २०१६’ चा मानकरी ठरला.

Nitin Raut 'Hanuman Shree' | नितीन राऊत ‘हनुमान श्री’

नितीन राऊत ‘हनुमान श्री’

यवतमाळ : शिवनेरी सोसायटीतील फिटनेस सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नितीन राऊत हा ‘हनुमान श्री - २०१६’ चा मानकरी ठरला. वैभव कदम बेस्ट पोझर, तर शुभम देशमुख याने बेस्ट इम्प्रुव्ह बॉडी बिल्डरचा मान मिळविला आहे.
ही स्पर्धा तीन वजन गटात घेण्यात आली. ६० किलो वजन गटात भरत भैसारे, शुभम देशमुख, सुरज वाघमारे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त केले. ६५ किलो वजन गटात नितीन राऊत, अभिजित शर्मा आणि पंकज गुल्हाने यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. ६५ किलोवरील वजन गटात वैभव कदम प्रथम, गजानन घावडे द्वितीय, तर औदुंबर चव्हाण तृतीय स्थानी राहिला.
पंच म्हणून प्रसाद पिंगळे, विशाल नांदेकर, विवेक सज्जनवार यांनी भूमिका पार पाडली. विदर्भ बॉडी बिल्डींग संघटनेचे उपाध्यक्ष पराग पिंगळे यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी डॉ. अतुल पाटील, डॉ. संतोष रत्नपारखी, सुभाष सज्जनवार, रवी लांबाडे, विदर्भ श्री दिनेश राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी विवेक सज्जनवार, बंटी उदापुरे, संतोष खंडारे, प्रकाश सज्जनवार, सचिन ठाकरे, रूपेश खंडारे, वैभव चांदोरे, भूषण राऊत, विनय राठोड आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Nitin Raut 'Hanuman Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.