श्रमिक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन भागवते
By Admin | Updated: April 4, 2017 00:09 IST2017-04-04T00:09:06+5:302017-04-04T00:09:06+5:30
श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक रविवारी येथील पत्रकार भवनात घेण्यात आली.

श्रमिक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन भागवते
यवतमाळ : श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक रविवारी येथील पत्रकार भवनात घेण्यात आली. यामध्ये नितीन भागवते हे अध्यक्षपदी तर अमोल शिंदे हे सचिवपदी भरघोस मतांनी निवडून आले.
निवडणूक निरीक्षक म्हणून विश्वास इंदुरकर हे उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिनेश गंधे यांची उपस्थिती होती. पत्रकार गणेश बयास, राज्य प्रतिनिधी गणेश राऊत, टी. ओ. अब्राहम, मावळते जिल्हाध्यक्ष नागेश गोरख आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती. यावेळी शहरातील श्रमिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)