कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:59 IST2017-08-25T21:56:49+5:302017-08-25T21:59:10+5:30
वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. देशभरात १०० तर विदेशात २० ठिकाणी प्रकाशन सोहळा घेण्यात आला. येथे आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिनेश बोरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. काशीनाथ लाहोरे उपस्थित होते. मुनिश्री तरुणसागर मंच गुरूपरिवाराचे अध्यक्ष रवींद्र काळे, मंदिरचे अध्यक्ष एन.बी. पिसोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कडवे प्रवचनातील भाग क्र.९ मधील काही उदाहरणेही यावेळी सांगण्यात आली. मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्यावरील काव्यगायनही दिनेश बोरा यांनी केले. अंजली गवारे यांनी मंगलाचरण, तर पुष्पाताई काळे व अनुराधा चाणेकर यांनी स्वागतगीत सादर केले. मुनिश्री स्वभाव सागर महाराज यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविक अॅड. रवीशेखर बदनोरे यांनी केले. संचालन राजेंद्र गुळकरी यांनी, तर आभार भास्करराव पोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला अॅड. ए.पी. दर्डा, महेंद्र दर्डा, महेंद्र सुराणा, अॅड. किशोर चोखाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नयनकुमार आगरकर, दीपक टोपरे, दिलीप कहाते, रवी कहाते, विजय रोडे, विजय काळे, अनिल पापळकर, वनिता बदनोरे, पुष्पाताई काळे, अलकाताई आगरकर, अनंत यावले, नंदू इंदाणे, विवेक नखाते, वसंत ठोकळ, कल्पनाताई काळे आदींनी सहकार्य केले.