शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नऊ हजार शेतकरी मुक्कामी

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत.

तूर विक्रीची प्रतीक्षा : बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव रूपेश उत्तरवार यवतमाळ तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत. मोजमाप होईल या आशेने ते रात्र जागून काढत आहेत. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या शेतकऱ्यांसाठी साध्या पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. बाजार समित्यांना प्रती क्विंटल एक रुपया सेस (शुल्क) दिला जातो. यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, शेतमालाची सुरक्षा, उपहारगृह, अत्यल्प दरात भोजन, गावापासून बैलगाड्यांनी शेतमाल घेवून येणाऱ्या जनावरांसाठी चारापाणी आदी व्यवस्था बंधनकारक आहे. परंतु दुर्दैवाने या सोयीसुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना शुद्ध तर दूर साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. प्रमुख बाजार समितीतच हे चित्र आहे, तर अन्य बाजार समित्यांमध्ये काय अवस्था असेल, याची यावरून कल्पना येते. शेतकऱ्यांमधून ओरड झाल्यानंतर यवतमाळ बाजार समितीने आता दोन दिवसांपासून पाणी व मसालेभाताची व्यवस्था केली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात तुरीच्या गंजीवरच रात्र काढावी लागत आहे. त्याच्या खाण्यापिण्याचेही वांदे सुरू आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळ व प्रशासनाविरूद्ध शेतकरी वर्गात रोष पाहायला मिळतो आहे. बाजार समिती एक रुपया सेस घेते कशासाठी, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. मुक्कामी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना उघड्यावर शौचास गेले म्हणून दंड भरावा लागतो. यवतमाळ केंद्रावर २०० शेतकरी मुक्कामी आहेत. दिग्रसमध्ये २५० शेतकरी, उमरखेडमध्ये १५०, पुसदमध्ये ५८८, बाभूळगावत ५०, कळंबमध्ये ६६, पांढरकवड्यात ६००, दारव्हा येथे ८००, घाटंजीत ३००, मुकुटबनमध्ये १०० शेतकरी मुक्कामी आहेत. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.