शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

निम्मा महाराष्ट्र टँकरवर; राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:59 IST

राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

१,४५२ गावे आणि ३,३०१ वाड्यांमध्ये ८२ शासकीय टँकरद्वारे, तर १,७७६ खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काेकणात ७१, खान्देशमध्ये ४०९, पश्चिम महाराष्ट्रात ३९२, मराठवाड्यात ९५३ आणि विदर्भात केवळ ३३ टँकर सुरू आहेत.

सूरज पाटीलयवतमाळ : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू हाेताच राज्यात पाणीटंचाईचे स्वरूप आणखी तीव्र झाले आहे. काेकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. राज्यात एकूण एक हजार ८५८ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, या पाणीबाणीत टँकर लाॅबी मालामाल हाेत आहे.

उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदे साेडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. काेट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईची समस्या निकाली निघू शकली नाही. त्यामुळे या याेजनांवर झालेला खर्च संशयाच्या भाेवऱ्यात सापडला आहे. अनेकदा टँकर लाॅबीला मालामाल करण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. प्रकल्पातील जलसाठा कमी हाेत आहे. विहिरी काेरड्या पडत आहेत, तर बाेअरवेलच्या पाण्याची पातळी कमी हाेत आहे. ही टंचाई टँकर लाॅबीला मालामाल करणारी ठरत आहे, तर दुसरीकडे टँकरमुक्तीची घाेषणाही हवेत विरली आहे.

येथे शून्य सिंधुदुर्ग, नंदुरबार, काेल्हापूर, हिंगाेली, नांदेड, अकाेला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गाेंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्यावर आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडा