निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:10+5:30

यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे.

Nilona and Chapadoh Dam 5% full | निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

Next
ठळक मुद्देयवतमाळकरांना खूशखबर : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्रता कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत तीन वर्षांपासून यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्याच्या विरुद्ध चित्र प्रकल्प क्षेत्रात आहे. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे. यवतमाळकर नागरिकांसाठी ही जमेची बाजू आहे. यावर्षी गत तीन वर्षांप्रमाणे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र सत्य आहे. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता ४.०६ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३ एमएमक्यू जलसाठा शिल्लक आहे. एकूणच क्षमतेच्या ६४ टक्के पाणी निळोणा प्रकल्पात आहे. यासोबतच चापडोह प्रकल्पात ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाचे साठवण क्षमता १२.२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत ९.०१ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. दोनही प्रकल्पांमध्ये १२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.
हा जलसाठा १२ महिने पुरेल इतका आहे. दर महिन्याला यवतमाळकरांना १ एमएमक्यू पाणी लागते. यासोबत वेस्टेज पाणी आणि पाण्याची नासाडी लक्षात घेता आठ महिने पुरेल इतके पाणी दोन्ही जलप्रकल्पात सध्या शिल्लक आहे. आॅक्टोबर २०२० पर्यंत हे पाणी यवतमाळकरांना पुरेल, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. यामुळे मार्च ते मे या कालावधीत यवतमाळमध्ये पाणीटंचाई भासणार नाही. जूनमध्ये पावसाचा विलंब झाला तरी त्याचा कुठलाही परिणाम यवतमाळकरांच्या दैनंदिन कामाजावर होणार नाही. प्रकल्पातील पाणी साठ्याची आलबेल स्थिती यावर्षी प्रथमच राहिली आहे.
यवतमाळकरांना सध्या ज्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होतो त्या वेळापत्रकानुसार म्हणजे चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याचे असेच वेळापत्रक राहणार आहे.

यावर्षी दोन्ही प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा कायम आहे. यामुळे पुढील काळात पाणी कपातीचे धोरण राहणार नाही, मात्र यवतमाळकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.
- सुरेश हुंगे
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

Web Title: Nilona and Chapadoh Dam 5% full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.