शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ‘मेडिकल’च्या कोरोना वॉडार्तून आला वडिलांच्या मृत्यूचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

येथील शासकीय कोरोना वॉर्डात उपाचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा निरोप मुलाला फोन कॉलद्वारे मिळाला. वयोवृध्द वडील अचानक सोडून गेल्याची वार्ता कानी पडताच संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले, आप्तस्वकीय, नातेवाईक निधनाची माहिती मिळल्याने सांत्वना करण्यासाठी घरी पोहोचले. तोच वडिलांचा श्वास सुरू असल्याचा संदेश मिळाला. हा धक्का त्या परिवारासाठी सहन करण्यापलीकडचा होता. निधनाचा कॉल करणाऱ्याने खातरजमा न करताचा त्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ केला.

ठळक मुद्देकुटुंबात रडारड : अखेरच्या दर्शनासाठी नातेवाईकांची थेट शवविच्छेदनगृहाकडे धाव, दोन तासानंतर समजले श्वास सुरूच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना वार्डात उपचारार्थ दाखल वृद्ध जीवंत असताना ते मरण पावल्याचा संदेश दिला गेला. त्यामुळे कुटुंबात रडारड झाली. मात्र काही वेळानंतर सदर वृद्ध जीवंत असल्याचे निष्पन्न झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वार्डातील यंत्रणेच्या या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  येथील शासकीय कोरोना वॉर्डात उपाचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा निरोप मुलाला फोन कॉलद्वारे मिळाला. वयोवृध्द वडील अचानक सोडून गेल्याची वार्ता कानी पडताच संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले, आप्तस्वकीय, नातेवाईक निधनाची माहिती मिळल्याने सांत्वना करण्यासाठी घरी पोहोचले. तोच वडिलांचा श्वास सुरू असल्याचा संदेश मिळाला. हा धक्का त्या परिवारासाठी सहन करण्यापलीकडचा होता. निधनाचा कॉल करणाऱ्याने खातरजमा न करताचा त्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ केला. मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता मुलाच्या फोनवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातून तो फोन कॉल आला. संबंधित व्यक्तीने आपला परिचय देत वडिलाचे निधन झाल्याचे सांगितले. हा संदेश मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी परिवार शवचिकित्सागृहात पोहोचला. इकडे यवतमाळातील रामनगर परिसरातील घरी नातेवाईक, मित्रमंडळी सांत्वना करण्यासाठी पोहोचली. रीतिरीवाजाप्रमाणे मयत झालेल्या घरात तयारी सुरू झाली. शवचिकित्सागृहात गेल्यानंतर त्या कुटुंबाला दुसरा धक्का बसला. त्यांनी सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आलेला नव्हता. नेमका काय प्रकार आहे, याची खातरजमा करण्यासाठी शवचिकित्सागृहातील कर्मचारी कोविड वॉर्डात पोहोचला. तेथे त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. निधन झाले नाही, अशीही पुष्टी मिळाली. हे समजून त्या परिवाराला हायसे वाटले. तिकडे घरी जमलेली मडीळीसुध्दा अवघडल्यासारखी झाली.

आरोग्य यंत्रणेने बेजबाबदारपणाचा गाठला कळस  एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती देताना खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र, कोविड रुग्णालयातील त्या अधिकाऱ्याने बेजबाबदारपणाचा कळस गाठला. निधनाची माहिती दिली. प्रकृती गंभीर असताना निधनाचा संदेश देऊन त्यांना मानसिक धक्का दिला. काही तासापुरते का होईना त्या उपचार घेत असलेल्या व्यक्तीची पत्नी अवसान गळून पडली होती. कुटुंबातील दोन मुले, सुना, नातवंड या सर्वांनाच शोक अनावर झाला होता. 

कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप दिला. प्रकरण माहीत झाल्यानंतर त्याची स्वत: चौकशी केली. कुटुंबीयातील सदस्याकडून ऐकण्यात गफलत झाली. त्यांनीच निधनानंतरची प्रक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारली. त्यातून आणखीच गैरसमज झाला. दोघांच्या संभाषणाचे काॅल रेकाॅर्डही असल्यास मागितले. ते मिळू शकले नाही. यात संबंधित डाॅक्टरची कुठलीच चुक नसल्याचे दिसून येते. - डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू