शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान व नमो सन्मानसाठी नवे नियम; शेती २०१९ पूर्वी नावावर असेल, तरच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:54 IST

Yavatmal : सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला घेता येणार दोन्ही योजनांचा लाभ

जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी २०१९पूर्वी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच पीएम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी, मुलांचे आधार जोडावे लागणार आहे. सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे.

शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाने २०१९मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून, राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो. पण, काही पती-पत्नी व २०१९नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. 

त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल, तर अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजनाYavatmalयवतमाळ