नवे नऊ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:17+5:30

पुसदमध्ये चार, नेरमध्ये एक तर दारव्हा येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासोबतच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. गत २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १६२ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाने १४ नमुने नव्याने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

New nine positives | नवे नऊ पॉझिटिव्ह

नवे नऊ पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसंख्या वाढतेय : पुसद, दारव्हा, नेर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला आहे. तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.
पुसदमध्ये चार, नेरमध्ये एक तर दारव्हा येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासोबतच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. गत २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १६२ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाने १४ नमुने नव्याने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत दोन हजार ९९२ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी २९६१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला तर ३१ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत २१० वर पोहोचली आहे. १५० रुग्ण बरे झाले आहेत. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या ५१ वर पोहोचली आहे.

ग्रामीण भागातील लोक बिनधास्त
ग्रामीण भागात कोरोना वाढत चालला आहे. मात्र या ठिकाणी कुणालाही कोरोनाची किंचितही भीती नाही. यातूनच बेसावध नागरिकांमध्ये कोरोना शिरत आहे. अशाच पद्धतीने पुढील काळात निष्काळजीपणा कायम ठेवला तर ही संख्या आणखी झपाट्याने वाढण्याचा धोका आहे.
 

Web Title: New nine positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.