१२५० बालकांच्या आयुष्यात नवी पहाट
By Admin | Updated: December 10, 2015 02:40 IST2015-12-10T02:40:48+5:302015-12-10T02:40:48+5:30
मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलांचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी मानवी हक्क बहाल करण्यात आले आहेत.

१२५० बालकांच्या आयुष्यात नवी पहाट
बालगृहाने दिला आधार : १०९८ चाईल्ड हेल्प लाईन
यवतमाळ : मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलांचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी मानवी हक्क बहाल करण्यात आले आहेत. भरकटलेल्या आणि अनाथ १२५० बालकांना संरक्षण देण्यासोबत त्यांना मानवी हक्क प्रदान करण्याचे काम बालगृहात केले जात आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि उपचार विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे. यामुळे बालगृहातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली आहे.
सुधारित अधिनियमानुसार काळजी व संरक्षणाची जबाबादारी स्वीकारण्यात आली आहे. घर किंवा राहण्याचे ठिकाण नाही. चरितार्थाचे कोणतेही साधन नाही. मानसिकदृष्ट्या अथवा शारीरिकदृष्ट्या विकलांग, बेघर, नैसर्गिक आपत्ती पीडित, बालकामगार, बाल भिक्षेकरी, हरवलेली, अनाथ अशा बालकांना येथे आधार दिला जोतो. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि उपचाराची जबाबदारी घेतली जाते.
जिल्ह्यातील ३३ बालगृहात अशी १२५० बालक आहेत. या बालकांना घडविण्याचे काम या ठिकाणी होत आहे. यातून बालकांना त्यांचे हक्क प्रदान करण्याचे काम करण्यात येत आहे.
कुमारी मातांच्या मुलांसाठी बालविकासचा संगोपन निधी
कुमारी मातांच्या पाल्यांचे शिक्षण करण्यासाठी महिला बाल विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यात ७३ बालके यासाठी पात्र ठरले आहेत. (शहर वार्ताहर)