सचिंद्रप्रताप सिंग यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी

By Admin | Updated: May 15, 2015 02:16 IST2015-05-15T02:16:43+5:302015-05-15T02:16:43+5:30

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचेही स्थानांतरण झाले असून,

New Collector of Sachindra Pratap Singh Yavatmal | सचिंद्रप्रताप सिंग यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी

सचिंद्रप्रताप सिंग यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचेही स्थानांतरण झाले असून, यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून परभणी येथील सचिंद्रप्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना परभणी येथे नियुक्त करण्यात आले. गुरूवारी सायंकाळी हा बदली आदेश जिल्ह्यात धडकला.
राज्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. त्यात यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचाही समावेश आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांचे स्थानांतरण नागपूर येथे राज्य राखीव दलात समादेशक म्हणून करण्यात आले. त्यांच्या जागेवर धुळे येथील अखिलेशकुमार सिंग हे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून यवतमाळात येणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांचे परभणी येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर परभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग येणार आहेत. सचिंद्रप्रताप सिंग हे २००७ च्या बॅचचे आयएएस आहेत. जिल्ह्याचे दोनही कर्णधार बदलल्याने प्रशासनाच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे. दोनही अधिकारी तरुण असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याला भरीव अपेक्षा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: New Collector of Sachindra Pratap Singh Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.