नेर खविसं काँग्रेस-राकाँ-भाजपकडे
By Admin | Updated: September 29, 2015 03:52 IST2015-09-29T03:52:55+5:302015-09-29T03:52:55+5:30
स्थानिक खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा या युतीने ११ जागा जिंकत आपला झेंडा फडकाविला.

नेर खविसं काँग्रेस-राकाँ-भाजपकडे
नेर : स्थानिक खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा या युतीने ११ जागा जिंकत आपला झेंडा फडकाविला. शिवसेनेला सहा जागांवर समाधान मानावे लागले. युतीचे संचालक आणि नेत्यांनी एकत्र येऊन विजयी जल्लोष केला.
या संस्थेची निवडणूक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची बनविली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र आली. युतीच्या विजयी संचालकांमध्ये अशोक बोनकिले, केशव जगताप, नीलेश देशमुख, निवृत्ती पठाडे, प्रमोद भिवरकर, विवेक घुईखेडकर, संजय पवार, मोहन जाधव, नलिनी गुल्हाने, शोभा घावडे, श्यामराव महल्ले यांचा समावेश आहे. शिवसेनेचे अण्णा भोकरे, अरुण लक्ष्मण वाठ, भास्कर तुपटकर, दामोधर काकडे, नितीन बोकडे, श्रीराम राठोड हे सहा उमेदवार विजयी झाले.
काँग्रेस-राकाँ-भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, जिल्हा बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर, पुरुषोत्तम लाहोटी आदींनी प्रयत्न केले. निवडणुकीसाठी २ हजार ३८६ पैकी १ हजार ६६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एन. गुल्हाने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम. कुंभरे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)