नेरमध्ये वीज अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: September 6, 2015 02:24 IST2015-09-06T02:24:57+5:302015-09-06T02:24:57+5:30
कमी दाबाचा वीजपुरवठा, विजेचा लपंडाव आदी प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी ४ वाजता वीज कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला.

नेरमध्ये वीज अभियंत्याला घेराव
नेर : कमी दाबाचा वीजपुरवठा, विजेचा लपंडाव आदी प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी ४ वाजता वीज कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला.
तालुक्यात थ्रि फेजचा आठ तास वीज पुरवठा निश्चित केला असला तरी दीड ते दोन तास वीज उपलब्ध होते. तालुक्याची पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र पाऊस नसल्याने पिके धोक्यात येण्याची भीती आहे. या स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज असतानाच आवश्यक तेवढा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. हाच प्रश्न घेऊन शेतकरी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर धडकले. सहाय्यक अभियंता रजेवर असल्याने नागरिक संतापले. दरम्यान, कार्यकारी अभियंता घोघटे आणि उपकार्यकारी अभियंता संजय खडसे यांना घेराव घातला.
यावेळी ठाणेदार गणेश भावसार उपस्थित होते. शेतकऱ्यांचे नेतृत्व निखिल पाटील जैत, सुनील खाडे, गोपाळ राठोड, उमेश गोळे, संतोष अरसोड, बाबूजी गोळे, मुकुंद गावंडे, नितीन गोळे, नंदू गावंडे, किशोर पवार, राजेश चव्हाण, नूरखान आदींनी केले. (तालुका प्रतिनिधी)