शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘जेडीआयईटी’त एनसीआरटीईटी शोधनिबंध परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:29 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद (एनसीआरटीईटी-२०१७) घेण्यात आली.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद (एनसीआरटीईटी-२०१७) घेण्यात आली. सिव्हील इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग विभाग आणि इंटरनॅशनल जर्नल फॉर इंजिनिअरिंग अ‍ॅप्लीकेशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडली. यामध्ये देशभरातून आलेले २५० हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले.परिषदेचे उद्घाटन संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या हस्ते सोवेनिअरचे प्रकाशन करून झाले. प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, परिषदेचे संयोजक डॉ. रामचंद्र तत्त्ववादी, सहसंयोजक डॉ. अतुल बोराडे, प्रा. अजय पारडे, आयोजन सचिव प्रा. अभिजित गिरी आदी मंचावर उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले.सिव्हील इंजिनिअरिंग विभागातून प्रथम बक्षीस बाबासाहेब नाईक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या प्रज्ज्वल गावंडे व सहकाºयांना मिळाले. द्वितीय बक्षीस जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जयेश फुलबांधे व चमूला प्राप्त झाले. शासकीय तंत्रनिकेतनची मिनल काटपल्लीवार व चमूला प्रोत्साहनपर बक्षिसाचा मान मिळाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून जेडीआयईटीचे ध्रुव आनंदपारा व सहकाºयांना प्रथम, द्वितीय बक्षीस प्रा. राम मेघे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराचे आयूष गुप्ता व सहकारी, तर प्रोत्साहनपर बक्षीस जेडीआयईटीतील यश कुंभारे व चमूला मिळाले.केमिकल इंजिनिअरिंग/बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागातून जेडीअीायईटीच्या राहुल तापके व चमूला प्रथम बक्षीस प्राप्त झाले. डॉ. भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकीचे प्रतिमा सिंग व चमूला द्वितीय, तर जेडीआयईटीतील सुमित खरगे व सहकाºयांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रीकल/टेक्सटाईल इंजिनिअरिंग या संयुक्त विभागातून प्रथम बक्षीस जेडीआयईटीतील स्वाती तोंडवळ व चमूला प्राप्त झाले. डॉ. एन.पी. हिराणी पॉलिटेक्नीक पुसदच्या हृतिक कटकमवर व सहकाºयांना द्वितीय, तर जेडीअीायईटीतील हर्षल सम्रीत व चमूला प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले.कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग विभागातून जेडीआयईटीची अश्विनी बोरा व चमू प्रथम बक्षिसाची मानकरी ठरली. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकीतील रिषभदेव शुक्ला व सहकाºयांना दुसरे बक्षीस मिळाले. जेडीआयईटीतील अक्षय लुणावत व चमूला प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. बक्षीस वितरणाने परिषदेची सांगता झाली. संचालन ऐश्वर्या गोटेकर, तर आभार डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी मानले.परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. रिना पानतावणे, प्रा. पंकज गावंडे, प्रा. योगेश बोरकर, प्रा. मयूर जिरापुरे, प्रा. अनुराग ढोले, प्रा. हितेश मेहता, प्रा. सफल वानखडे, प्रा. अतुल शिंदे, प्रा. मयूरी शेठिया, प्रा. पल्लवी कुंभारे, प्रा. पवन मोखडकर, प्रा. महेश गोरडे, राजेश गेडाम, चंद्रकांत शंभरकर, नितीन शेंद्रे, मनिष गुल्हाने, प्रेमेंद्र शुंकर, विद्यार्थी समन्वयक संकेत कोल्हे, सोमेश जवादे, अब्दुल तौसिफ, गौरव वारजुरकर, अभय मदनकर, शिवानी जाधव, शिवानी हातगावकर, अचल भोयर, अपूर्वा झेंडे, अंकुश शेंडे, शिमांशू पांडे आदींनी पुढाकार घेतला. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.या परिषदेसाठी आदित्य बिर्ला ग्रुप चंद्रपूरचे सुनील देसाई, बजरंग कंस्ट्रक्शन रामटेकचे बजरंग मेहर, जीनमाता ट्रेडर्सचे संजय अग्रवाल, युनाईटेड ट्रेडर्सचे अब्दुल हुसेन, कॅड सेंटरचे विक्रम नागरगोजे, हाजी स्टोअर्सचे मक्खी सेठ, मोबाईल्स यवतमाळचे पंकज सोनटक्के, राऊत पेट्रोलपंपचे सागर राऊत, नेटलॉग सायबर कॅफेचे अजय रामेकर, साई लर्नर अकॅडमीचे अमित ढोणे, थाऊझंड पॉर्इंटचे राहुल हातागले, व्ही.एस. टोटल फिटनेसचे विवेक सजनवार, अर्नव सायबर कॅफे व गोदावरी अर्बन को-आॅप. बँकेचे सहकार्य लाभले. या प्रतिष्ठान व संस्थांच्या प्रतिनिधींचे यावेळी स्वागत करण्यात आले.