राष्ट्रवादीच्या लता खांदवे यांचे सभापतीपद कायम

By Admin | Updated: February 2, 2016 02:07 IST2016-02-02T02:07:49+5:302016-02-02T02:07:49+5:30

नगर परिषदेच्या हद्दवाढीने जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती लता खांदवे यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.

NCP's Lata Khandwe elected as its president | राष्ट्रवादीच्या लता खांदवे यांचे सभापतीपद कायम

राष्ट्रवादीच्या लता खांदवे यांचे सभापतीपद कायम

जिल्हा परिषद : उच्च न्यायालयाचा दिलासा, पुढील आदेशापर्यंत अधिसूनचेला स्थगिती
यवतमाळ : नगर परिषदेच्या हद्दवाढीने जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती लता खांदवे यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. मात्र या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून पुढील आदेशापर्यंत अधिसूचनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांचे पद कायम आहे.
यवतमाळ लगतच्या आठ ग्रामपंचायती नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. यासाठी २२ जानेवारी रोजी शासनाने अधिसूचना जारी केली. यात समाजकल्याण सभापती लता खांदवे यांच्यासह चार पंचायत समिती सदस्यांचे पद बरखास्त करण्यात आले. मात्र खांदवे यांनी या अधिसूचनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी हद्दवाढीच्या अधिसुचनेला विरोध न करता केवळ आपले पद कायम ठेवावे, अशी याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती भूषण गवई व पी.डी. देशमुख यांच्या संयुक्तपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली. यात न्यायालयाने खांदवे यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते वकील अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: NCP's Lata Khandwe elected as its president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.