आर्णी बाजार समितीत राष्ट्रवादी, भाजप, सेना आघाडीची बाजी
By Admin | Updated: October 11, 2016 02:51 IST2016-10-11T02:51:57+5:302016-10-11T02:51:57+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना आघाडीने १३

आर्णी बाजार समितीत राष्ट्रवादी, भाजप, सेना आघाडीची बाजी
आर्णी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना आघाडीने १३ जागांवर विजय संपादित करत या निवडणुकीत बाजी मारली, तर काँग्रेस व सेना माजी आमदार गटाचा सफाया झाला.
आर्णी बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी, भाजपा आणि सेना आघाडीने विजय संपादित केला. त्यात राष्ट्रवादीचे आठ, भाजपा तीन, शिवसेना दोन असे १३ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले, तर दोन उमेदवार अविरोध निवडून आले होते. विजयी उमेदवारात राजेंद्र पाटील, रवींद्र नालमवार, संदीप बुटले, उमेश ठाकरे, दशरथ जाधव, नारायण गिलबिले, साधना तिवारी, गफूर शहा, मुनेश्वर आडे, अनिल जगताप, दुर्गा वानखडे, स्वप्नील राऊत, भोपीदास पेंदोर, तर काँग्रेस-शिवसेना माजी आमदार गटाचे राजू बुटले, अहमद तंवर, परशराम राठोड, उत्तम भोंडे निवडून आले. तर अमोल बेलगमवार, पवन पनपालिया अविरोध आले होते. आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांच्या गटाला या निवडणुकीत बहुमत मिळाले असून काँग्रेसच्या ताब्यातील ही बाजार समिती या गटाने ताब्यात घेतली आहे. तालुक्याच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे गटाला पराभव पत्करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश अंबिलपुरे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)