पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सव$$्निरमेश झिंगरे ल्ल बोटोणी

By Admin | Updated: October 21, 2015 02:51 IST2015-10-21T02:51:39+5:302015-10-21T02:51:39+5:30

येथून जवळच असलेल्या पांडवदेवी देवस्थान तिवसाळा येथे २२ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.

Navratri at Pandavadevi Devasthan $$ Benjamin Zinger | पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सव$$्निरमेश झिंगरे ल्ल बोटोणी

पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सव$$्निरमेश झिंगरे ल्ल बोटोणी

येथून जवळच असलेल्या पांडवदेवी देवस्थान तिवसाळा येथे २२ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.
विदर्भातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सवात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक पहाटेपासूनच महाआरतीकरिता येतात. येथील पांवडवकालीन हेमाडपंथी शिवालयाच्या जीर्णोद्वाराचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. हे स्थान पर्यटनस्थळात समाविष्ट होणार आहे. जळका बसस्थानकापासून दक्षिणेस वनश्रीने नटलेल्या स्थळी पांडवदेवी देवस्थान आहे. जिल्ह्यात प्रमुख शिवमंदिरे १०९ आहेत. त्यापैकी २९ मंदिरे निरनिराळ्या देवी-देवतांचे आहेत. त्यापैकी हे एक भव्य शिवालय आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक वि.भि. कोलते यांच्या शिलालेखावरून हे मंदिर इसवी सन १०६७ पूर्वी बांधले असावे, असे निदर्शनास येते. वनश्रीने नटलेल्या तिवसाळा घनदाट अभयारण्यात चिरकाल स्थित काळ्या कुरकुरीत पाषाण दगडाचे हेमाडपंथी पांडवदेवी मंदिर आहे.
सदर मंदिर हेमाडपंथी असून तेथे रेणुका मातेची मूर्ती व दुर्गादेवीचे देवस्थान आहेत. या मंदिरातील शिवलिंगापासून केळापूर येथील जगदंबा व चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे जाणकार सांगतात. मंदिरासमोर पांडवांचे सभागृह असल्याचे उत्खननात आढळून आले. पूर्वी पांडव अज्ञानवसात असताना येथे त्यांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पांडवांचे आराध्य दैवत असलेले शिवलींग आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासून भक्तांची महाआरतीकरिता गर्दी होते. नऊ दिवस जळका, कोठोडा, बोटोणी, आवळगाव, कान्हाळगाव येथील भजन मंडळ भजन करतात. तेथे महिलांची मोठी गर्दी असते, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायण खडसे यांनी सांगितले.

Web Title: Navratri at Pandavadevi Devasthan $$ Benjamin Zinger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.