झरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षा
By Admin | Updated: January 13, 2017 01:37 IST2017-01-13T01:37:04+5:302017-01-13T01:37:04+5:30
जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा (घाटंजी)मार्फत घेण्यात येणारी जवाहर नवोदय परीक्षाा

झरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षा
मुकुटबन : जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा (घाटंजी)मार्फत घेण्यात येणारी जवाहर नवोदय परीक्षाा येथील आदर्श विद्यालयात सुरळीत पार पडली. या परीक्षेला ४२७ विद्यार्थ्यांपैैकी ४२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सात विद्यार्थी गैैरहजर होते.
झरी तालुक्यातील एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या येथील आदर्श विद्यालयाच्या २१ वर्गखोल्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची मोफत व्यवस्था शासनाद्वारे करण्यात येते. या परीक्षेला मराठी माध्यमाचे ३५७ विद्यार्थी, तर इंग्रजी माध्यमाचे ५६ विद्यार्थी बसले होते.
यावर्षी पहिल्यांदाच २१ पर्यवेक्षकांचे मोबाईल परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवून जप्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्राला जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. यावेळी केंद्र संचालक सोमेश्वर चिंतावार, विस्तार अधिकारी आर.आर.रजनलवार, केंद्रप्रमुख प्रकाश दिकोंडवार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)