‘एसईए’च्या अध्यक्षपदी नवनीत सावरकर

By Admin | Updated: December 3, 2015 02:54 IST2015-12-03T02:54:46+5:302015-12-03T02:54:46+5:30

सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनच्या विभागीय अध्यक्षपदी नवनीत सावरकर तर विभागीय सचिवपदी सुहास मेश्राम यांची नियुक्ती झाली आहे.

Navneet Savarkar as the Chairman of SEA | ‘एसईए’च्या अध्यक्षपदी नवनीत सावरकर

‘एसईए’च्या अध्यक्षपदी नवनीत सावरकर

वीज अभियंत्यांची बैठक : विभागीय सचिवपदी सुहास मेश्राम
यवतमाळ : सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनच्या विभागीय अध्यक्षपदी नवनीत सावरकर तर विभागीय सचिवपदी सुहास मेश्राम यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी अभियंता पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या असोसिएशनच्या सभेत या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
वीज अभियंत्यांच्या या सभेमध्ये सहसचिव प्रकाश कोळसे यांनी मार्गदर्शन केले. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटना सभासदांच्या विभागीय स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी यवतमाळ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन आणि गरज भासल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटना अधिक मजबूत करून सर्व सभासदांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला. इंजिनिअर्स असोसिएशनच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आला. आता पुन्हा नव्या जोमाने पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचा संकल्प करण्यात आला. या सभेसाठी माजी सहसचिव अशोक पवार, विभागीय सचिव कडू, नरेंद्र राऊत, मुरलीधर राऊत, दिलीप भास्करवार, रितेश सव्वालाखे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Navneet Savarkar as the Chairman of SEA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.