मुलाखतीसाठी जिल्हा बँकेला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:38 IST2017-10-06T00:38:31+5:302017-10-06T00:38:43+5:30

जिल्हा बँकेच्या कंत्राटी लिपीक पदाच्या मुलाखतीमुळे गुरुवारी बँकेला यात्रेचे स्वरूप आले होते. अडीच हजारांवर उमेदवारांनी लांबच लांब रांग लावली होती.

Nature of Yatra for district bank interview | मुलाखतीसाठी जिल्हा बँकेला यात्रेचे स्वरूप

मुलाखतीसाठी जिल्हा बँकेला यात्रेचे स्वरूप

ठळक मुद्देकंत्राटी भरती : १७८ जागा, अडीच हजार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा बँकेच्या कंत्राटी लिपीक पदाच्या मुलाखतीमुळे गुरुवारी बँकेला यात्रेचे स्वरूप आले होते. अडीच हजारांवर उमेदवारांनी लांबच लांब रांग लावली होती. जिल्हा बँकेपासून शहर पोलीस ठाण्यापर्यंत ही दुहेरी रांग गेल्याने या मार्गावरून जाणारे अचंबित होत होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत कंत्राटी लिपिकांची पदभरती सुरू आहे. १७८ जागांसाठी तब्बल अडीच हजार उमेदवारांनी अर्ज केले. या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात आल्या. यासाठी बँकेसमोर उमेदवारांची लांबच लांब रांग लागली होती. एकाचवेळी सहा जणांच्या चमूकडून या मुलाखती घेण्यात आल्या. सध्या शासनस्तरावरील पदभरती बंद असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक आता मिळेल तिथे अर्ज करताना दिसत आहे. जिल्हा बँकेच्या कंत्राटी जागेसाठी अडीच हजार अर्ज आले. या अर्जदारांची थेट मुलाखत बँक प्रशासनाकडून घेतली जात आहे.

Web Title: Nature of Yatra for district bank interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.