दिग्रस येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 21:22 IST2017-08-19T21:19:25+5:302017-08-19T21:22:32+5:30
संजय देशमुख मित्र मंडळाच्यावतीने येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानमध्ये पाच दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिग्रस येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : संजय देशमुख मित्र मंडळाच्यावतीने येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानमध्ये पाच दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
निसर्गाच्या प्रकोपामुळे लागवडीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न येत नाही. त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. मात्र कृषीऋषी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सांगितले. दिग्रस येथे आयोजित या शिबिरात सुमारे ७०० शेतकरी सहभागी झाले होते.