राष्ट्रवादी काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन
By Admin | Updated: November 1, 2015 02:47 IST2015-11-01T02:47:44+5:302015-11-01T02:47:44+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन
महागाईला विरोध : बसस्थानक चौकात रास्ता रोको
यवतमाळ : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या युती शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज राज्यातील सामान्य नागरिक अडचणीत आला आहे. वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने येथील बसस्थानक चौकात शनिवारी रास्ता रोको केला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले.
राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला जात आहे. त्याला मदत देण्यासाठी शासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आली नाही. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत शासन महागाई कमी करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नाही. डाळ, दूध यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती रोखण्यासाठी शासनाने प्राईज मॉनिटरिंग सेल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करून तहसीलदार अनुप खांडे यांना निवेदन दिले. यावेळी आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, पंचायत समिती सभापती गायत्री ठाकूर, नगरपालिका सभापती अरुणा गावंडे, पांडुरंग खांदवे, तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर, सुरेश चिंचोळकर, हरीश कुडे, सपना लंगोटे, विवेक देशमुख, दीपक धात्रक, पंकज मुंदे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)