विषबाधितांंना राष्टÑवादीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:37 IST2017-10-09T00:37:36+5:302017-10-09T00:37:50+5:30
जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी ...

विषबाधितांंना राष्टÑवादीची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे दिली.
फवारणी बाधित रुग्णांच्या भेटीसाठी यवतमाळात आले असता त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत राष्टÑवादी काँग्रेस तुमच्या संकटात सोबत असल्याचे सांगितले. राष्टÑवादीच्या स्थानिक पदाधिकाºयांकडून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत जाहीर केली. गंभीर रुग्णांवर मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात उपचार करण्यासाठी राष्टÑवादी पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयातील स्थितीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विषबाधित रुग्णांवर परंपरागत पद्धतीनेच उपचार केले जातात. आता यामध्ये नवनवीन संशोधन झाले असून उपचारपद्धती अधिक प्रभावित झाली आहे. मात्र त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, विजय तेलंगे आदी उपस्थित होते.
राष्टÑवादीची संवेदनशीलता
यवतमाळ ‘मेडिकल’ विषबाधित रुग्णांमुळे चर्चेत आले आहेत. मंत्री, राज्यमंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी या रुग्णांच्या भेटीसाठी येत आहेत. परंतु रुग्णांना थेट मदत किंवा आस्थेने विचारपूस करण्याचे औदार्य कुणीच दाखविले नाही. राष्टÑवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर व जिल्हाध्यक्षांनी रुग्णालयात शनिवारी सकाळी भेट दिली असता सर्व रुग्णांना बिस्कीट व फळे देऊन आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला. तसेच बंद असलेल्या एसीबाबत अधिष्ठातांना जाब विचारुन तत्काळ एसी सुरू करून घेतला.
कळंबमध्ये शेतकरी कुटुंबीयांची भेट
कळंब - फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेले कळंब येथील शेतकरी देवीदास मडावी यांच्या घरी भेट देऊन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांंचे सांत्वन केले. कृषी विभागाच्या दुर्लक्षित धारणामुळे शेतकºयांचा जीव गेला. यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चांदोरे, मनीषा काटे आदी उपस्थित होते.