नाशिकमधील घटनेचा घाटंजीत निषेध
By Admin | Updated: September 25, 2016 02:58 IST2016-09-25T02:58:08+5:302016-09-25T02:58:08+5:30
नाशिक जिल्ह्यातील नांदुरा नाका येथे भटक्या विमुक्त समाजातील चिमुकलीवर अत्याचार झाला.

नाशिकमधील घटनेचा घाटंजीत निषेध
तहसीलदारांना निवेदन : बंजारा बांधवांतर्फे कारवाईची मागणी
घाटंजी : नाशिक जिल्ह्यातील नांदुरा नाका येथे भटक्या विमुक्त समाजातील चिमुकलीवर अत्याचार झाला. या घटनेचा घाटंजी येथे बंजारा बांधवांनी जाहीर निषेध नोंदविला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निषेधाचे निवेदन तहसीलदार गजभिये यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. यावेळी भारतीय बंजारा स.से. संस्था, वसंतराव नाईक क़से. संस्था, राष्ट्रीय बंजारा टायगर्स, गोर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तारवजखेड (जि.उस्मानाबाद) येथील गोरबंजारा वस्तीला आग लावण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील नारळी कुरळी येथे १५० बंजारा बांधवांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली. नांदुरा नाका (जि.नाशिक) येथील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाला. गोरबंजारा समाजावरील अन्यायाच्या घटना वाढत आहे.
अशा नराधमांना न्यायालयीन चौकशी करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हाध्यक्ष अरविंद जाधव यांनी केली.
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड, शहर अध्यक्ष संजय आडे, बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे सचिव विजय राठोड, वसंतराव नाईक कर्मचारी सेवा संस्थेचे सचिव विठ्ठल राठोड, रवी राठोड, रोडबाजी राठोड, मानसिंग राठोड, विनोद राठोड, संजय राठोड, पंकज राठोड, राजू पवार, मनोज राठोड, हितेश जाधव, संतोष राठोड, राजू राठोड, विलास राठोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)