शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

माजी आमदारांचे नाव वापरुन ‘पीए’चा बेरोजगारांना गंडा, काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:17 IST

 यवतमाळ - बेरोजगार युवकांना कर्ज काढून देण्याचे आमिष देत माजी आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) बनावट कागदपत्रे बनवून परस्पर पैसे उकळले. हा प्रकार लक्षात येताच माजी आमदारांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात आपल्या स्वीय सहायकासह आणखी एका विरोधात फसवणूक व खोटे दस्तावेज तयार केल्याची तक्रार दाखल केली. काँग्रेसच्या माजी आमदार नंदिनी पारवेकर यांचा ...

 यवतमाळ - बेरोजगार युवकांना कर्ज काढून देण्याचे आमिष देत माजी आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) बनावट कागदपत्रे बनवून परस्पर पैसे उकळले. हा प्रकार लक्षात येताच माजी आमदारांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात आपल्या स्वीय सहायकासह आणखी एका विरोधात फसवणूक व खोटे दस्तावेज तयार केल्याची तक्रार दाखल केली. काँग्रेसच्या माजी आमदार नंदिनी पारवेकर यांचा स्वीय सहायक नीलेश सुरेंद्र ठोंबर (४०) रा. पारवा ता. घाटंजी व गौरव मानेकर (३२) रा. सिंघानियानगर या दोघांनी पारवेकर यांच्या स्वाक्षरीचे खोटे दस्तावेज तयार केले. शिवाय पारवेकर यांच्या बँक खात्याचा दहा लाखांचा धनादेशही तयार केला. या आधारावर या दोघांनी संजय जाधव, प्रेम जाधव, रोहण चंदनखेडे, पजगाडे, गौरव भंगाडे यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. त्यांना शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार आणि पशुसंवर्धन विभागातून अनुदानावर कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दिले होते. हा प्रकार संजय जाधव यांनी नंदिनी पारवेकर यांना संपर्क केल्यानंतर उजेडात आला. याबाबत नंदिनी पारवेकर यांनी चौकशी केली व फसवणूक झालेल्या युवकांकडील कागदपत्रांची पाहणी केली असता. त्यांच्या नावाने पीए नीलेश ठोंबरे याने खोटे दस्तावेज तयार केल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर ठोंबरे याने पारवेकर यांच्या नावाने असलेल्या बँक खात्याच्या धनादेश क्रमांक २७२१११ हा दहा लाख ८० हजार रुपये इतकी किंमत टाकून परस्परच प्रेम जाधव याला दिला. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात येताच नंदिनी पारवेकर यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली. यावरून वडगाव रोड पोलिसांनी पीए नीलेश ठोंबरे व गौरव मानेकर यांच्या विरोधात भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक नंदकुमार आयरे करीत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हे