माय करिअर लॉन्चरचे विद्यार्थी ‘जेईई’मध्ये चमकले
By Admin | Updated: May 11, 2014 00:42 IST2014-05-11T00:42:34+5:302014-05-11T00:42:34+5:30
येथील ‘माय करिअर लॉन्चर’च्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ मेन्स २०१२ मध्ये भरीव यश संपादन केले आहे. जेईई अॅडव्हान्ससाठी होणार्या परीक्षेसाठी या संस्थेचे ...

माय करिअर लॉन्चरचे विद्यार्थी ‘जेईई’मध्ये चमकले
यवतमाळ : येथील ‘माय करिअर लॉन्चर’च्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ मेन्स २०१२ मध्ये भरीव यश संपादन केले आहे. जेईई अॅडव्हान्ससाठी होणार्या परीक्षेसाठी या संस्थेचे ७० पैकी २७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच व्हीआयटी वेल्लूर या नामांकित अभियांत्रिकी संस्थेत प्रवेशासाठी चार विद्यार्थी पात्र ठरले आहे. ‘माय करिअर लॉन्चर’ या संस्थेत जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स या अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षेची नियमित तयारी करून घेतली जाते. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून ११ वी आणि १२ वी सायन्स, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेतात. याठिकाणी मुला-मुलींसाठी लॉजिंग आणि बोर्डिंगची सुविधा आहे. प्रत्येक विषयाच्या प्रिंटेड नोटस्, समुपदेशन, भविष्यातील नोकरी आणि करिअरच्या संधीबद्दल मार्गदर्शन गेस्ट लेक्चररकडून मिळते. एकाच ठिकाणी सर्व सुविधा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत यश प्राप्त झाले आहे. यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास माय करिअर लाँचरच्या संचालकांनी व्यक्त केला.