मुस्लीम समाज विवाह मेळावा थाटात
By Admin | Updated: May 10, 2017 00:24 IST2017-05-10T00:24:19+5:302017-05-10T00:24:19+5:30
येथील अंजूमन फिदायाने मुस्तफा संस्थेच्यावतीने मुस्लीम समाज सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.

मुस्लीम समाज विवाह मेळावा थाटात
३० जोडपी निकाहबद्ध : दिग्रसच्या अंजूमन फिदायाने मुस्तफाचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील अंजूमन फिदायाने मुस्तफा संस्थेच्यावतीने मुस्लीम समाज सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मेळाव्यात तब्बल ३० जोडपी निकाहाच्या पवित्र बंधनात अडकली.
येथील अंजूमन उर्दू विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या विवाह सोहळ्यात वर व वधू पक्षाकडील वऱ्हाड्यांची प्रचंड गर्दी जमली होती. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, डॉ.प्रकाश नंदूरकर, नगराध्यक्ष सदफजहां, माजी नगराध्यक्ष विजय बंग, आरेफ काझी, पुसद अर्बनचे संचालक सुधीर देशमुख, अॅड.सुधाकर जाधव, प्रा.विठ्ठल काटेवाले, राहूल शिंदे, श्रीचंद राठोड, हाजी वसीमभाई, नगरपरिषद उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक वसंता मडावी, केतन रत्नपारखी, रमाकांत काळे, यासिन नागाणी, बासिफ खान, हनिफ फानन उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक संयोजक जावेद पटेल यांनी केले. त्यांनी मेळावा आयोजनामागील भूमिका विषद केली.
गत दहा वर्षांपासून अविरत हा उपक्रम सुरू असून अद्यापपर्यंत शेकडो गरीब व अनाथांचे संसार थाटण्यात आले. यावेळी बोलताना मौलाना काझी अबूल जफर म्हणाले, मुलीचा विवाह म्हणजे प्रत्येक पालकांना आज ओझ वाटत आहे. लाखो रुपयांचा अनाठाई खर्च होत आहे. एवढा खर्च करूनही मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाची शाश्वती नाही. मात्र मुस्लीम समाजाची अत्यंत सुलभ, साधी, आदर्श विवाह पद्धत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी मुस्लिमांनी डीजे, बँड, घोडा, गाडीला हद्दपार केले. हुंड्याची तर संकल्पनाच नाही. उलट वराला महेरच्या स्वरूपात वधूला पैसे द्यावे लागतात. हुंडाबळी व घटस्फोटाचेही प्रमाण कमी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात डॉ.प्रकाश नंदूरकर आणि मेळाव्याचा जेवणाचा खर्च उचलणारे नगरपरिषद सभापती जावेद पहेलवान यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वीतेसाठी अॅड.ताजअली मलनस, फारूक इसानी, मकसूद अहेमद, म.आरेफ म.मतीन, अ.कय्यूम, म.सलिम, सुफीमिया देशमुख, म.खीजर, म.जसीम, म.इब्राहीम, आसिफ गोंदिल, म.जाकीर, म.रफीक, प्रा.मतीन खान, अॅड.साजीद वर्षाणी, हाजी सज्जू पहेलवान, सै.मतीन, अ.हादी, इरफान खान, सै.एहफाज हाजी, रफीक बेग, नजीर बेग, अ.मुजीब, शहेबाज पहेलवान, फिरोज खान, सै.अकरम, अॅड.मोसीन मिर्झा, अॅड.सैयद इदरीस, म.फारूक सलीम, सलीमसेठ सौदागर, रमजान ताज, अजहर मिर्झा यासोबतच भाजी मार्केट ग्रुप, एकता क्रिकेट क्लब, शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला सर्व मशिदीचे इमामदेखील उपस्थित होते.