मुस्लीम बांधवांची निषेध रॅली

By Admin | Updated: December 20, 2015 02:40 IST2015-12-20T02:40:17+5:302015-12-20T02:40:17+5:30

हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमरखेडमध्ये तीव्र पडसाद उमटले.

Muslim rally protest rally | मुस्लीम बांधवांची निषेध रॅली

मुस्लीम बांधवांची निषेध रॅली

एसडीओंना निवेदन : आक्षेपार्ह वक्तव्याचा उमरखेडमध्ये निषेध
उमरखेड : हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमरखेडमध्ये तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी तिवारी यांच्या निषेधार्थ शेकडो मुस्लीम बांधवांनी शांततामय मार्गाने निषेध रॅली काढून आपला संताप व्यक्त केला.
सकाळी १० वाजता तातारशाह बाबा दर्गाह येथून निघालेल्या निषेध रॅलीत मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने फिरत १२ वाजताच्या सुमारास ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार, इनायतउल्ला जनाब, मौलाना अख्तर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन दिले.
पैगंबर मोहम्मद मुस्तफा (सल्ते अलै व सल्लम) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविली. त्यांच्याविरुद्ध रासुका अंतर्गत झालेल्या कारवाईपेक्षाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार, इनायतउल्ला जनाब, मौलाना अख्तर यांनी रॅलीला संबोधित केले. यात म. गणी शाह, जिया उल हक, एजाज अहमद खान, मुफ्ती मौलाना सैय्यद आबेद, मौलाना अ. रऊफ, मौलाना मो. वसीम अहमद, मौलाना जावेद रजा, शे. इसराईल, जावेद अहमद बारी, हफीज मो. जाहीद रजा, शे. इसराईल, अ. रऊफ, मो. असिफोद्दीन खतीब, सै. इरफान, मझहर टेलर, गाजी असर, बासीद कुरेशी, सै. तेहजीर आदींसह शेकडो मुस्लीम बांधव रॅलीत सहभागी झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Muslim rally protest rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.