मुस्लीम गवळी समाज विवाह मेळावा

By Admin | Updated: May 15, 2017 01:02 IST2017-05-15T01:02:23+5:302017-05-15T01:02:23+5:30

मुस्लीम गवळी बिरादरीच्यावतीने सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते.

Muslim Gavli Samaj Marriage Fair | मुस्लीम गवळी समाज विवाह मेळावा

मुस्लीम गवळी समाज विवाह मेळावा

३५ जोडपी विवाहबद्ध : दिग्रस मुस्लीम गवळी बिरादरीचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : मुस्लीम गवळी बिरादरीच्यावतीने सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात ३५ जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्याला वऱ्हाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून मंचावर मौलाना मोहमद सादिक आलमगिरी, मौलवी इरफान हाफीज अशफाक, मौलवी असलम, मौलवी अलताफ, मौलवी नासीर, मौलवी इसहाक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष विजय बंग, तहसीलदार किशोर बागडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, आरोग्य सभापती जावेद पहेलवान, बांधकाम सभापती बाळू जाधव, शिक्षण सभापती सैयद अकरम, पाणीपुरवठा सभापती के.टी. जाधव उपस्थित होते.
रविवारी सकाळी १०.३० वाजता मेळावा पार पडला. गत १३ वर्षांपासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता विवाह सोहळा अखंडपणे घेतला जातो. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना मौलवी महमद युनूस म्हणाले, आज एकीकडे विकासाच्या लख्ख प्रकाशाबाबत आपण अतिउत्साही आहो, तर दुसरीकडे देश व समाजात पसरलेले अवनती व आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषमतेचा अंधार आपणास अस्वस्थ करतो. शासन नेहमीच अशा बाबींकडे लक्ष देत असते. परंतु दूरदृष्टी, नियोजन व पारदर्शकतेच्या अभावामुळे अपयशच हाती येते. या सर्व मानवी समस्यांचे निराकरण केवळ इस्लामी शिक्षणातच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक किशोर साबू, फिरोज पहेलवान, भाजपाचे शहराध्यक्ष रमेश करवा, प्रमोद बनगिनवार, हर्षील शाह, राजा चव्हाण, सलिम पटेल, शंकर जाधव, हाजी शौकत मलनस, जावेद पटेल, मुख्याधिकारी शेषराव टाले, वन अधिकारी संदीप गिरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बंडू नवरंगाबादे, नगरसेवक रुस्तम पप्पूवाले, नासीर नवरंगाबादे, असलम पतलेवाले, अ‍ॅड.इरफान नवरंगाबादे, हुसेन भगतवाले, इस्त्राईल आलमवाले, डॉ.शारीक नवरंगाबादेसह बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Muslim Gavli Samaj Marriage Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.