मुस्लीम पित्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 02:33 IST2015-06-15T02:33:05+5:302015-06-15T02:33:05+5:30

गरिबीमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण झालेल्या एका पित्यापासून सहा महिन्याच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले.

Muslim father did the daughter-in-law of a Hindu girl | मुस्लीम पित्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान

मुस्लीम पित्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान

थाटात विवाह : सहा महिन्याची असल्यापासून दीपालीचा केला सांभाळ
किशोर वंजारी नेर
गरिबीमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण झालेल्या एका पित्यापासून सहा महिन्याच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले. तिचे संगोपन करून एका मुस्लीम पित्याने तिच्याच पसंतीच्या तरुणासोबत रविवारी विवाह लावून कन्यादान केले. राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणारा हा अनोखा विवाह सोहळा रेणुकापूर देवस्थानात शेकडोंच्या साक्षीने पार पडला.
नेर तालुक्यातील विश्वनाथ आणि मनोरमा या दाम्पत्याला चारही मुली. घरी गरिबी त्यामुळे सांभाळ कसा करावा असा प्रश्न. अशातच सहा महिन्याच्या दीपालीला शेजारी राहणारे नईम बेग मिर्झा व शहानुरबी या दाम्पत्याने दत्तक घेतले. मिर्झा यांनी तिला पोटच्या गोळ्याप्रमाणे माया देऊन मोठे केले. दीपालीला शबाना म्हणून आवाज देऊ लागले. शहानूरबी दीपालीसाठी यशोदा झाली. तिला बारावीपर्यंत शिकवून यवतमाळच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश दिला. अशातच दीपालीचे गावातीलच प्रवीण पजगाडे या तरुणासोबत प्रेम जुळले. प्रवीणने दीपाली उर्फ शबानाच्या लग्नाची मागणी घातली. कोणतेही आढेवेढे न घेता मिर्झा कुटुंबाने होकार दिला. लग्न करण्याचे ठरले. मुस्लीम रिवाजाप्रमाणे पत्रिकाही वाटल्या. रविवारी रेणुकापूर येथील देवस्थानात हा सोहळा थाटात पार पडला. मुस्लीम पित्याने आपल्या हिंदू मुलीचे कन्यादान केले. भरपूर उपहारही दिला. आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठविताना मिर्झा परिवाराच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Web Title: Muslim father did the daughter-in-law of a Hindu girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.