मुरूम चोरणाऱ्या टिप्पर चालकास अटक, दोघांवर गुन्हा
By Admin | Updated: November 27, 2015 02:46 IST2015-11-27T02:46:02+5:302015-11-27T02:46:02+5:30
अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून चोरून नेत असलेल्या दोन जणांवर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुरूम भरलेला टिप्पर जप्त करण्यात आला. तसेच चालकाला अटक केली आहे.

मुरूम चोरणाऱ्या टिप्पर चालकास अटक, दोघांवर गुन्हा
पुसद : अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून चोरून नेत असलेल्या दोन जणांवर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुरूम भरलेला टिप्पर जप्त करण्यात आला. तसेच चालकाला अटक केली आहे.
अशोक सीताराम पठाडे असे अटकेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव असून सुरज रमेश चिद्दरवार रा.देवी वॉर्ड पुसद असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ.राजू बाबळे व तलाठी कैलास चंद्रवंशी यांनी आज धाड मारली. त्यावेळी टिप्पर क्र.एम.एच.२९/८३५८ हा दोन ब्रास मुरूम घेवून येथील तेलगू वसाहतीकडे जात असताना आढळून आले. त्याचा पाठलाग करून थांबविण्यात आला. चौकशी केली असता मुरूमाचे अवैध उत्खनन करून चोरून नेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर कारवाई करून सदर टिप्पर पुसद शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या प्रकरणी टिप्पर चालक अशोक पठाडे याला अटक करण्यात आली, तर मालक सुरेश चिद्दरवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)