एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST2021-05-16T04:40:30+5:302021-05-16T04:40:30+5:30
रामपूरनगरमधील घटना : खंडाळा पाेलिसांनी घेतली घटनास्थळी धाव पुसद : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून ...

एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
रामपूरनगरमधील घटना : खंडाळा पाेलिसांनी घेतली घटनास्थळी धाव
पुसद : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून खून केला. तालुक्यातील रामपूरनगर येथे शनिवारी (१५ मे) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूरनगरात ही घटना घडली. मृत युवती सुवर्णा आणि आरोपी आकाश हे दोघेही एकाच गावात राहात होते. त्यांच्यात ओळख झाली. आकाश हा सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता.
शनिवारी सकाळी सुवर्णाचे आई, वडील, भाऊ बाहेरगावी गेल्याची संधी साधून आकाशने सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास सुवर्णाचे घर गाठले. त्याने घरी जाऊन सुवर्णावर चाकू, गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आकाशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे.