शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जुगाराच्या वादातून युवकाचा खून, मध्यरात्रीची घटना पहाटे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:45 IST

पहाटे 2 वाजताची घटना: संशयित आरोपी फरार

ठळक मुद्देसंशयित आरोपी सतीश कुचनकर, गोलू घायवान यांनी जुगाराच्या वादात खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.

यवतमाळ : शहरातील जाम मार्गावरील मुलकी परिसरात रामकृष्णनगर येथे युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. जुगार खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. प्रफुल्ल गणेश बडदे (२५) रा.मुलकी असे मृताचे नाव आहे. तो याच परिसरातील टावर जवळ टपरीसमोर बसून मद्यपान व जुगार खेळत होता. पहाटे २ वाजताच्या सुमारास जुगारावरून वाद झाला. यात प्रफुल्लच्या डोक्यावर, हातावर, कमरेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार परिसरातील नागरिकांना सकाळी ६ वाजता आढळून आला. घटनास्थळी अंथरून व पांघरूणावर रक्ताचा सडा पडला होता. मारेकऱ्याचे बुटही घटनास्थळी पडून होते.

प्रफुल्ल हा अवैध दारू विक्री व जुगार यासारखे धंदे करत होता. सोमवारी दुपारी त्याचा आर्णी नाका परिसरात काही युवकासोबत वाद झाला होता. त्यातूनच हा खून झाला की रात्रीच्या जुगाराच्या डावात झालेल्या वादातून प्रफुल्लची हत्या झाली याचा शोध अवधूतवाडी पोलीस घेत आहे. घटनास्थळावर एका टपरीसमोर हा खून झाल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रवीण परदेशी, अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह ठसे तज्ज्ञांनीही भेट दिली. घटनास्थळावर काही पुरावे हाती लागतात काय याचा शोध पोलिसांनी घेतला. 

या गुन्ह्यातील संशयितांची पोलिसांनी लगेच धरपकड सुरू केली. अवधूतवाडी ठाण्यातील शोध पथकाने पाच संशयितांना ताब्यात घेतले. मात्र ज्यांच्यावर दाट संशय असलेले सतीश कुचनकर व गोलू घायवान दोघेही रा.दांडेकर लेआऊट मुलकी हे पसार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. शिवाजीनगरातील खुनाच्या घटनेची शाई वाळत नाही तोच मुलकीत खून झाला. यावरून शहरात पुन्हा खुनाचे सत्र सुरू होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. 

अवैध दारू, जुगार सुरूच मुलकी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचे गुत्ते आहेत. येथे रस्त्यावरच जुगारही चालत असल्याचे घटनास्थळी दाखल महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. उपविभागीय अधिकारी माधुरी बावीसकर यांच्यासमोरच दारू विक्रीच्या आरोपावरून दोन महिलांमध्ये भांडण जुंपले होते. परिसरातील नागरिक या अवैध व्यवसायाने त्रस्त असल्याचे येथील महिलांनी सांगितले. या भागात गुन्हेगारीला पुरक वातावरण अवैध व्यवसायातून निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिस