वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:31 IST2021-09-02T05:31:24+5:302021-09-02T05:31:24+5:30

पुसद : तालुक्यातील आरेगाव येथे बेलफूल वाटणाऱ्या वृद्ध महिलेचा दागिने लुटून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस ...

Murder of an old woman robbed of her jewelery | वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून

वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून

पुसद : तालुक्यातील आरेगाव येथे बेलफूल वाटणाऱ्या वृद्ध महिलेचा दागिने लुटून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

यशोदाबाई कोंडबा सातव (६०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. यशोदाबाई विधवा होत्या. त्या दररोज लोणी येथे बेलफूल वाटायच्या. सोमवारी भरपूर पाऊस पडत असल्याने, काही काळ त्या लोणीच येथे थांबल्या. पावसाने उघडीप देताच, आपल्या गावाकडे निघाल्या. मात्र, दोन दिवसांपासून त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. अखेर बुधवारी त्यांचा मृतदेहच महादेव मंदिरालगत असलेल्या जोडरस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या उसाच्या शेतात आढळून आला.

त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पाने, हातातील चांदीचे कडे व पाटल्या चोरट्याने हिसकावून त्यांचा पाय बांधला. नंतर खून केल्याचा संशय प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांच्यामागे एक विवाहित मुलगी आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

Web Title: Murder of an old woman robbed of her jewelery