नगरपरिषद प्रशासन रस्ता कंत्राटदारांवर उदार

By Admin | Updated: May 3, 2016 02:52 IST2016-05-03T02:52:35+5:302016-05-03T02:52:35+5:30

शहरातील चार झोनमध्ये रस्ते निधीतून १ कोटी २४ लाखांचे उष्ण यांत्रिकी पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले. या

Municipal Councilors are generous on road contractors | नगरपरिषद प्रशासन रस्ता कंत्राटदारांवर उदार

नगरपरिषद प्रशासन रस्ता कंत्राटदारांवर उदार

यवतमाळ : शहरातील चार झोनमध्ये रस्ते निधीतून १ कोटी २४ लाखांचे उष्ण यांत्रिकी पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले. या कामांच्या निविदा काढण्यापूर्वी पालिका प्रशासनाने मोजमाप करूनच प्रक्रिया पूर्ण केली. काम मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी २० ते २४ टक्के कमी दराने निविदा भरल्या. आता काम पूर्ण झाल्यानंतर या कंत्राटदारावर पालिका प्रशासन उदार झाले असून, वाढीव परिमाणातून बुस्टर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी मंगळवारी होत असलेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवला जाणार आहे.
कोणत्याही कामाची निविदा प्रक्रिया व कार्यादेश देताना त्या कामाचे मोजमाप संबंधित यंत्रणेकडून केले जाते. त्यानुसारच कामावर होणारा खर्च निश्चित केला जातो. एखाद्या वेळेस अपवादात्मक स्थितीत प्रत्यक्षात काम वाढल्यास तशा वाढीव कामाची काम सुरू असतानाच मंजुरी घेतली जाते. येथे मात्र काम पूर्ण होऊन कित्येक महिने लोटले. त्यानंतर आता वाढीव परिमाणाची सबब पुढे करून रस्ते निधी कंत्राटदारावर उधळण्याचा डाव आखला जात आहे.
शहरातील झोन क्रमांक एकच्या रस्ता डांबरीकरणाचे काम २३.३० टक्के कमी दराने घेतले. तसेच झोन दोनमध्ये २१.६० टक्के, झोन तीनमध्ये २०.७० टक्के, झोन चारमध्ये २१.५० टक्के कमी दराने काम घेतले. निविदा प्रक्रिया करार करताना कंत्राटदाराकडून जितके टक्के कमी दरात काम घेतले, तितकी रक्कम अनामत म्हणून ठेवणे आवश्यक आहे.
कारण कामाची गुणवत्ता कशी राहणार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सोय केली आहे. प्रत्यक्षात शहरातील डांबरीकरणाच्या कामात केवळ १० टक्के अनामत रक्कम ठेवण्यात आली. स्वत: बांधकाम विभागातील अभियंत्याने मोजमाप पुस्तिका तयार करूनच काम झाले. आता या कामांना वाढीव परिमाण कशासाठी, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १५ डिसेंबर २०१५ च्या विशेष सभेत रस्ते निधीच्या या कामांना मंजुरी घेतली होती. आता वाढीव परिमाण दाखवून पुन्हा अधिकचा निधी कामावर खर्च करण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. या विषयावर नगरसेवक सभागृहात काय भूमिका घेतात, हे महत्वाचे ठरणार आहे.
याप्रमाणेच फिरते शौचालय खरेदीतही मोठा अपहार झाला असून, आता पुन्हा त्याच पद्धतीने शौचालय व मूत्रिघर खरेदीचा विषय सभेपुढे ठेवला जाणार आहे. जुन्या तक्रारीचा कुठलाही निपटारा न झाल्याने हाही मुद्दा लक्षवेधी ठरणार आहे. बऱ्याच अवधीनंतर सर्वसाधारण सभा होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

स्वच्छता कंत्राटाचा प्रश्नही गाजणार
४३१ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने ३ मे रोजी ही सभा होत आहे. यात प्रमुख विषय शहरातील सफाई कंत्राटाचा आहे. १२ आॅगस्ट २०१५ पासून तात्पुरत्या मंजुरीवर शहर स्वच्छतेचे काम सुरू आहे. आर्थिक तरतूद नसताना आता अशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविली जाते. शहरात नव्याने समाविष्ठ झालेल्या क्षेत्रासाठी या विषयात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तब्बल वर्षभरापासून तात्पुरत्या कंत्राटावर शहर स्वच्छतेचे काम सुरू आहे. यावर नगरसेवकांची भूमिका काय राहते, याकडे लक्ष लागले आहे.

झोन क्रमांकरस्ते निधीकमीची निविदा
१ (प्रभाग ३, ४, १०)४२ लाख ६५ हजार ६३०२३.३० टक्के
२ (प्रभाग १, २, ६)१७ लाख ६७ हजार २५०२१.६० टक्के
३ (प्रभाग ५, ९)२४ लाख ४८ हजार २७०२०.७० टक्के
४ (प्रभाग ७, ८)४२ लाख ८ हजार ९९०२१.५० टक्के

Web Title: Municipal Councilors are generous on road contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.