शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

साडेसहा लाख कोटींचे ‘मुद्रा लोन’ बुडीत खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:39 IST

एनपीए ७० टक्क्यांवर : केवळ व्यापाऱ्यांकडून होतोय परतावा

राजेश निस्ताने

यवतमाळ : उपजीविका चालविता यावी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी देशभरात दिल्या गेलेल्या मुद्रा लोनपैकी ७० टक्के कर्जाची परतफेडच झालेली नाही. त्यामुळे सुमारे सहा लाख ५० हजार कोटी रुपयांची रक्कम बुडीत (एनपीए) होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली. याकारणाने कर्ज वाटणाºया बँकाच आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत.

केंद्र शासनाने ८ एप्रिल २०१५ ला ‘मुद्रा लोन’ ही योजना सुरू केली. शिशू ५० हजार, किशोर पाच लाख तर तरुणांना पाच ते दहा लाख अशी या कर्जाची वर्गवारी होती. या कर्जासाठी कोणतीही हमी(सिक्युरिटी) घेतली गेली नाही. ८० टक्के राष्टÑीयीकृत बँकांनी हे कर्ज वाटप केले. उर्वरित कर्ज वाटप कमर्शियल बँका, एनबीएफएसमार्फत (नॅशनल बॅँकिंग फायनान्स सर्व्हिसेस) केले गेले. आतापर्यंत नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे वाटप कर्ज स्वरूपात केले गेले. १९ कोटी २४ लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला. अर्थात प्रत्येकी सरासरी ४९ हजार ६११ रुपयांचे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळाले. त्यापैकी गेल्या तीन वर्षात सात कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले गेले. गेल्या पाच वर्षांत मुद्रा लोन म्हणून वाटलेल्या कर्जापैकी २३ टक्के रक्कम आताच एनपीए (बुडीत) झाली आहे. लगतच्या भविष्यात हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत (सहा लाख ५० हजार कोटी) पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.योजना बँकांच्या हिताची नाहीच्मुद्रा लोनच्या सद्यस्थितीबाबत देशातील अर्थतज्ज्ञांनी आपली मते नोंदविली आहेत. त्यात त्यांनी बहुतांश बँकांच्या आगामी आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.च्रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नमूद केले की, मुद्रा लोन ही योजना सरकारच्या स्तरावर लोकप्रिय आहे, मात्र बँकांच्या हिताची नाही. या योजनेमुळे बँका धोक्यात येण्याची भीती आहे.च्रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनीसुद्धा मुद्रा लोन अंतर्गत वाटप झालेले कर्ज पुढे बुडीत होण्याची शक्यता वर्तविली आहे. मुद्रा लोनचे उद्दिष्ट सरकार निश्चित करीत असल्याने बँकांना कर्ज वाटप करावेच लागते. त्यासाठी अनेक निकष बाजूला ठेवावे लागत आहेत.च्रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुद्रा लोन वितरित करताना बँकांनी बारकाईने पहावे, परताव्याची क्षमता तपासावी असा सल्ला दिला आहे. शिवाय मुद्रा लोन एनपीएमध्ये परिवर्तित होत असल्याने बँकिंग क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त केला आहे.जुने-नवे करण्याचा बँकांना सल्लादेशभर सहा लाख ५० हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन थकीत होत आहे. हा एनपीए बँकांसाठी अडचणीचा ठरला आहे. त्यावर पर्याय म्हणून या कर्जाला जुने-नवे करण्याचा सल्ला बँकांना दिला गेला आहे. नवे कर्ज देऊन जुन्या कर्जाची वसुली करावी म्हणजे नवे कर्ज एनपीए व्हायला आणखी पाच वर्षे मिळतील, असा यामागील अजेंडा आहे. या जुन्या-नव्याच्या माध्यमातून मुद्रा लोनची पर्यायाने केंद्र सरकारची व बँकांची इभ्रत वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे.

टॅग्स :businessव्यवसायbankबँक