सांसद आदर्श ग्राम भारीत दारूबंदी

By Admin | Updated: July 14, 2015 01:57 IST2015-07-14T01:57:35+5:302015-07-14T01:57:35+5:30

शहरालगतच्या खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम भारी येथे दारूबंदी करण्यात आली. स्थानिक

MP Model Village Heavy Duty | सांसद आदर्श ग्राम भारीत दारूबंदी

सांसद आदर्श ग्राम भारीत दारूबंदी

यवतमाळ : शहरालगतच्या खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम भारी येथे दारूबंदी करण्यात आली. स्थानिक महिलांनी पुढाकार घेवून गावात दारूबंदीचा निर्णय घेतला. आता बाहेरगावहून येणारीही दारू बंद करण्यात यावी, या मागणीसाठी महिलांनी शहर ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना सोमवारी निवेदन दिले.
सांसद आदर्श ग्राम भारी येथे अनेक उपक्रम व विकासात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. गावातील सामजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी दारूबंदी किती महत्त्वाची आहे, हे येथील महिलांना पटवून देण्यात आले. त्यानंतर गावातील बचत गटांच्या महिलांनी पुढाकार घेवून येथील अवैध व्यवसाय आणि दारू बंद करण्याचा निर्णय घेतला. शहर पोलिसांनीही त्यांना या कामात सहकार्य केले. त्यामुळे गावातील दारू पूर्णत: बंद झाली आहे. मात्र आता गावालगतच्या जंगल परिसरात आणि विशेष करून पारवा येथून दारू आणली जात आहे. गावातील दारूडे येथे जावून दारू पिवून येतात. हा प्रकार थांबविण्यात यावा, या मागणीसाठी भारी येथील महिला बचत गटाच्या अध्यक्ष भारती निकोडे यांच्या नेतृत्त्वात अनिता बोंबले, वंदना कांबळे, संध्या ठाकरे, सारिका गजभिये, रविता धुर्वे यांच्यासह अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. लवकरच बाहेरगावहून येणाऱ्या दारूचाही बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन या महिलांना ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी दिले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: MP Model Village Heavy Duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.