शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 9:19 PM

आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे.

ठळक मुद्देवर्तनात क्रौर्य, नावात गंमत : दहशत पसरविण्यासाठी आगळ्या वेगळ्या नावांचा केला जातो वापर

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे. यवतमाळातील गुन्हेगारीचा आलेख जसजसा वाढतोय, तसतशी नवनव्या गुन्हेगारांची नवनवी चित्रविचित्र टोपण नावेही समोर येत आहेत. वरवर चामत्कारिक वाटणारी ही नावे सामान्य माणसांना आतल्या आत मात्र घाबरवून सोडत आहेत.‘बस नाम ही काफी है’ हा चित्रपटातील डॉयलॉग फेमस आहे. यवतमाळच्या गुन्हेगारी जगतातील नवोदित गुंडांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी टोपण नावे धारण केली आहेत. पोलीस रेकॉर्डवरही त्यांची याच नावाने नोंद आहे. यवतमाळ शहराच्या गुन्हेगारीचा प्रवास बघता पूर्वीच्या नावांमध्ये एक जरब दिसून येते. तर आताची टोपण नावे विकृत स्वरूपाची आहेत. अर्थातच पूर्वीपेक्षा गुन्हेगारांच्या क्रूरतेचे प्रमाणही वाढले. आता किरकोळ वादात थेट खून करण्याचे प्रकार वाढत आहेत.गट्ट्या आणि पीडी ही गुन्हेगारी जगतात सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली टोपण नावे आहेत. गट्ट्या म्हणजे प्रशांत दुबे आणि पीडी म्हणजे प्रवीण दिवटे, कधी काळी सोबतच काम करणारे हे दोघे एकमेकांचे शत्रू बनले. मात्र, वर्चस्वाच्या संघर्षाने दोघांनाही संपवले. त्यांचे अंधानुकरण करणारे गल्लीबोळातील अनेक गुन्हेगार तयार झाले आहेत. त्यांची टोपण नावेही तितकीच मजेशीर आहेत.वर्चस्वाच्या वादातून जामनकरनगरमध्ये यादव व पवार टोळीत संघर्ष झाला. यात पुढे आलेल्या टोपण नावाने सर्वांनाच धक्का दिला. ‘सोनू ऊर्फ संडास’ एखाद्याचे नाव संडास असू शकते ही कल्पनाच अनेकांना विचित्र वाटली. पण हा ‘संडास’ काही साधासुधा नाही. त्याने २०१५ मध्ये सलमान सोलंकीचा गेम केल्याचा आरोप आहे. आता प्राणघातक हल्ल्यात तो पुन्हा जेरबंद झाला आहे.यवतमाळची गुन्हेगारी राजकीय आश्रयावर पोसली जात आहे. ‘व्हाईट कॉलर’कडून अल्पवयीन मुलांचा वापर होतो. अनेक गोष्टी तपासत रेकॉर्डवर आणल्या जात नाही. त्यामुळेच येथे १५ ते २५ वर्षे वयोगटातील सक्रीय व तितकेच क्रूर गुन्हेगार पाहावयास मिळतात. घरफोड्या, चोऱ्या व वाटमारी करणाºयांचीही एक वेगळी कॅटेगिरी आहे. या सर्वांचीच टोपण नावे वाचायला, ऐकायला विचित्र अन् विक्षिप्त वाटणारी आहेत. एखाद्याच्या नावातूनही त्याची वैचारिक स्थिती लक्षात येते. गुन्हेगारांना ही नावे त्यांच्या टोळक्यातील स्वकीयांकडूनच देण्यात आली आहे, हे विशेष.फोक्याभाई, हड्डी, लेंडी अन् झुरक्याही !पोक्या (घरफोडी), फोक्याभाई, हड्डी, झुरक्या, मोगण्या, लॅपटॉप, बगीरा (दोघे अक्षय टोळीचे सदस्य), लायण्या, डोमा, भोकण्या, चिकण्या (घरफोडीत मास्टर), कोंबडी, जादू (सायकल चोर), लेंडी (शरीर दुखापतीचे गुन्हे), कवट्या, सागवान, कमची, येडा, लेड्या, मकडी, जॉन्टी, आठ-नऊचा पाणा, लांजा, गवत्या, काल्या, हकल्या (हा उभरता गँस्टर) तडी, अंक्या, साधू, खटक्या, टावर, आंड्या, टकल्या, हॅँडल ही गुन्हेगारी जगतात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली नावे आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाYavatmalयवतमाळ