आरोग्य केेंद्राचे बांधकाम करण्यास चालढकल
By Admin | Updated: October 2, 2016 00:21 IST2016-10-02T00:21:22+5:302016-10-02T00:21:22+5:30
येथील नगरपरिषद शाळा क्रमांक सातजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात नगरपरिषद अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम मंजुर झाले आहे.

आरोग्य केेंद्राचे बांधकाम करण्यास चालढकल
सीओंना निवेदन : बांधकाम सुरू करण्याची मागणी
वणी : येथील नगरपरिषद शाळा क्रमांक सातजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात नगरपरिषद अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम मंजुर झाले आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली नसून संबंधित विभागाने बांधकामास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक अभिजीत सातोकर व एका नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गेल्या २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १ नुसार नगरपरिषद शाळा क्रमांक सातजवळ असलेल्या खुल्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यास सभेने प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंर्गत नगरपरिषदेला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाची नवीन इमारत मंजुर करण्यात आली.
विकास योजनेच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सदर विषय चर्चेला येवून त्या जागेवर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यास नगरपरिषदेचा ठराव पारित झाला असल्यास बांधकाम करण्यास कोणतीही हरकत नाही, असे सहाय्यक संचालक, यवतमाळच्या नगर रचनेने सभेत स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र इमारत बांधकामाला अजूनही सुरूवात झाली नसून नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्वरित बांधकाम सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अभिजीत सातोकर व एका नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)