आईने सांगितले कुलर लाव, चिमुकल्यासह दोघांचाही मृत्यू

By विलास गावंडे | Updated: September 5, 2023 21:19 IST2023-09-05T21:19:30+5:302023-09-05T21:19:38+5:30

शॉक लागल्याने दगावले : वाढत्या उकाड्याचे बळी

mother said start cooler, both child died due to shock | आईने सांगितले कुलर लाव, चिमुकल्यासह दोघांचाही मृत्यू

आईने सांगितले कुलर लाव, चिमुकल्यासह दोघांचाही मृत्यू

आर्णी (यवतमाळ) : कुलरचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना दाभडी येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. वाढत्या उकाड्याचे हे दोघे बळी ठरले. वनिता सुनील राठोड (३५), कुणाल सुनील राठोड (९) रा.दाभडी. ता.आर्णी, अशी मृतांची नावे आहेत.

वनिता या सायंकाळी शेतातून घरी आल्या. त्यावेळी त्यांनी मुलगा कुणाल याला कुलर लावण्यात सांगितले. बटण सुरू करताच कुणालला शॉक लागला. त्याचवेळी त्याच्या अंगावर कुलर पडला. हा प्रकार लक्षात येताच वनिता कुलर उचलण्यासाठी गेल्या. त्यांनाही शॉक लागला. घर मातीचे असल्याने कुलरच्या पाण्यामुळे जमिनीला ओल आली होती. त्यामुळे कुलर सुरू करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या कुणाल याला शॉक लागल्याचे सांगितले जाते.

शॉक लागल्याने निपचित पडलेल्या दोघांनाही दाभडी गावातील गणेश राठोड यांच्या वाहनाने आर्णी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Web Title: mother said start cooler, both child died due to shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.