शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पैनगंगेत उडी घेवून माय-लेकीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

नंदाबाई किशोर वानखेडे (४०) आणि साक्षी किशोर वानखेडे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहे. गुरुवारी सायंकाळी नंदाबाई यांचा पतीसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादातूनच नंदाबाई यांनी मुलगी साक्षी हिला सोबत घेऊन रात्री घर सोडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सोईट-घडोळी येथील पैनगंगा नदीत त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. शुक्रवारी सकाळी सोईट येथील काही नागरिक जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले असता ही घटना उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभवानी/ढाणकी : उमरखेड तालुक्यातील सोईट-घडोळी येथील पैनगंगा नदीच्या पात्रात माय-लेकीचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या दोघींनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज दराटी पोलिसांनी वर्तविला.नंदाबाई किशोर वानखेडे (४०) आणि साक्षी किशोर वानखेडे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहे. गुरुवारी सायंकाळी नंदाबाई यांचा पतीसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादातूनच नंदाबाई यांनी मुलगी साक्षी हिला सोबत घेऊन रात्री घर सोडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सोईट-घडोळी येथील पैनगंगा नदीत त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. शुक्रवारी सकाळी सोईट येथील काही नागरिक जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी पोलीस पाटील परमेश्वर बुरकुले यांना माहिती दिली. बुरकुले यांनी दराटीचे ठाणेदार भरत चपाईतकर यांना माहिती दिली. दराटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. नंदा व त्यांची मुलगी साक्षीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तूर्तास दराटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. मृत नंदा वानखेडे यांना मृत साक्षी यांच्याशिवाय आणखी दोन मुले आहेत. त्यांचे मातृछत्र हरविले आहे.दरम्यान, मायलेकीच्या या मृत्यूमुळे भवानी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघींचा मृतदेह पैनगंगा नदीत आढळल्याचे समजल्यानंतर भवानीचे पोलीस पाटील सुदर्शन कवाने, सरपंच चंद्रकला सुदाम पवार यांच्यासह भवानी, सोईट, वालतूर, घडोळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दराटी पोलीस व गावकऱ्यांनी दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. या घटनेने  गावावर शोककळा पसरली आहे.  क्षुल्लक वादातून दोन जीव गेल्याने  हळहळ व्यक्त होत आहे. 

मृतदेहांवर माहेरी वडगाव येथे होणार अंत्यसंस्कार- मृत नंदा किशोर वानखेडे यांचे माहेर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथील आहे. गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास नंदा व त्यांची मुलगी साक्षी घरातून निघून गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी वानखेडे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळल्या नाही. अखेरीस पैनगंगा नदीपात्रात त्यांचे मृतदेहच तरंगताना आढळले. दराटी पोलिसांनी पंचनाम्यानंतर दोघींचेही मृतदेह उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नंदा यांच्या भावांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्यावर वडगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या दोन्ही भावांनी दिली.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस