पालकमंत्र्यांद्वारे ‘आयसोलेशन’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:26+5:30

पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Monitoring of 'isolation' by Guardian Ministers | पालकमंत्र्यांद्वारे ‘आयसोलेशन’ची पाहणी

पालकमंत्र्यांद्वारे ‘आयसोलेशन’ची पाहणी

Next
ठळक मुद्देक्वारंटाईन कक्षालाही भेट : ‘१०८’ रुग्णवाहिका दुरुस्तीचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ‘१०८’ रुग्णवाहिकांसह इतरही रुग्णवाहिकांची दुरुस्ती इमर्जन्सी फंडातून तात्काळ करण्याचे व रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साधने उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.
पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परदेश किंवा बाहेरून आलेले काही नागरिक तपासणीसाठी आले होते. त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नसली तरीही त्यांनी घरात स्वतंत्रपणे राहून योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. तेथील डॉक्टर व पारिचारिका यांच्याशीही त्यांनी संवाद साधला व दक्षतेबाबत सूचना दिल्या. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांंची तपासणी, देखरेख ही प्रक्रिया काटेकोरपणे करावी, असे त्या म्हणाल्या.
शासनाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

नागरिकांची तपासणी व ट्रॅकिंग ठेवा
वलगाव येथे उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन वॉर्डाची त्यांनी पाहणी केली. येथे १०० व्यक्ती राहू शकतील, अशा सुविधा उपलब्ध आहेत. परिचर, सहायक आदी कर्मचारी वर्गही तिथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास मोझरी येथेही अशी सुविधा उभारता येईल. जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेंतर्गत २९ वाहने उपलब्ध आहेत. त्यातील नादुरुस्त वाहनांची तात्काळ दुरुस्ती, परदेशातून येणाºया नागरिकांची तपासणी व ट्रॅकिंग ठेवणे आणि सर्वांना सजग राहण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Monitoring of 'isolation' by Guardian Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.