मोमिनपुऱ्यात थरार!

By Admin | Updated: July 10, 2015 07:00 IST2015-07-10T02:44:13+5:302015-07-10T07:00:36+5:30

नमाज पठण करून घराकडे निघालेल्या तरुणावर सशस्त्र हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या.

Momentum Thunder! | मोमिनपुऱ्यात थरार!

मोमिनपुऱ्यात थरार!

कुख्यात गुंडावर गोळ्या झाडल्या : प्रचंड तणाव
नागपूर : नमाज पठण करून घराकडे निघालेल्या तरुणावर सशस्त्र हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या डोक्यात आणि जबड्यात रुतल्यामुळे इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) हा गंभीर जखमी झाला. गुरुवारी पहाटे ४.४५ ते ५ च्या दरम्यान मोमिनपुऱ्यात ही घटना घडली. यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
इफ्तखार बकरा मंडीजवळ राहातो. नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे तो मशिदीत नमाज पढायला गेला. ४.४५ वाजता मित्र आणि परिचितांशी सलाम-दुवा करीत तो पायीच घराकडे निघाला. पोलीस चौकी नजिकच्या मदनी चिकन सेंटरजवळ अचानक चार आरोपींनी त्याला घेरले. दोघांनी त्याचे हात पकडले तर एकाने त्याच्यावर पिस्तुल रोखले. धडधाकट इफ्तखारने जोरदार प्रतिकार केला. यामुळे झटापट झाल्याने पिस्तुलातून झाडलेली पहिली गोळी त्याच्या शरीराला चाटून गेली. तो जुमानत नसल्यामुळे एका हल्लेखोराने जवळचा चाकू काढून त्याला भोसकण्याचा प्रयत्न केला. इफ्तखारने चाकू घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याच्या हाताला जबर दुखापत झाली अन् त्याची पकडही सैल पडली. त्यामुळे हल्लेखोरांनी दुसरी गोळी डोक्यात तर तिसरी गळ्यावर (कानाखाली) झाडली. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला मृत समजून आरोपी पळून गेले.
दरम्यान, ही घटना अनेकांसमोर घडली. त्यामुळे इफ्तखारला उचलून आजूबाजूच्या मंडळींनी वाहनात घातले आणि मेयोत नेले. त्याची प्रकृती लक्षात घेत डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नंतर त्याला धंतोलीतील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्रदीर्घ शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Momentum Thunder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.