पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: March 26, 2017 01:15 IST2017-03-26T01:15:37+5:302017-03-26T01:15:37+5:30
स्थानिक पोलीस मुख्यालयात क्वॉर्टर गार्डच्या ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला.

पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग
यवतमाळ : स्थानिक पोलीस मुख्यालयात क्वॉर्टर गार्डच्या ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली.
संदीप किसन केंद्रे (२९) रा.नांदेड ह.मु. वणी पोलीस स्टेशन, असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. संदीप हा पोलीस भरती बंदोबस्तासाठी यवतमाळात आला होता. तो शुक्रवारी सायंकाळी मुख्यालयात पोहोचला. तेथे क्वॉर्टर गार्डवर असलेल्या महिला पोलीस शिपायाचा मोबाईल हिसकावून फोडला. त्याचा जाब विचारला असता त्याने सदर महिलेला गार्ड रूममध्ये लोटून मारहाण केली. हा प्रकार पाहून इतर कर्मचारी धावून आले. त्यांनी संदीपच्या तावडीतून महिला शिपायाची सुटका केली. नंतर संदीप केंद्रे तेथून पसार झाला.