मोघे महाविद्यालय नॅक "बी" श्रेणीने मानांकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:30+5:302021-08-14T04:47:30+5:30
६ व ७ ऑगस्टला नॅक पिअर टीमने भेट दिली. या भेटीत त्यांनी महाविद्यालयाचा मागील पाच वर्षांचा सर्वांगीण विकास, शिवाय ...

मोघे महाविद्यालय नॅक "बी" श्रेणीने मानांकित
६ व ७ ऑगस्टला नॅक पिअर टीमने भेट दिली. या भेटीत त्यांनी महाविद्यालयाचा मागील पाच वर्षांचा सर्वांगीण विकास, शिवाय सर्व विभाग, पालक, आजी-माजी विद्यार्थी, व्यवस्थापन, विविध सेल, प्रशासकीय बाबींचे निरीक्षण व परीक्षण करून बंगलोर येथील नॅक कार्यालयाला अहवाल सादर केला. नॅक कार्यालयाचा अहवाल महाविद्यालयाला प्राप्त झाला असून, त्यात महाविद्यालयाला सीजीपीए २.४३ सह ''बी'' मानांकन प्राप्त झाले आहे. नॅक पिअर चमूमध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक व मध्यप्रदेश येथील विद्यापीठाचे प्राचार्य व तज्ज्ञ प्राध्यापक होते. त्यांनी महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. संस्था सचिव विजयराव मोघे यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. एस. आर. वऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात व नॅक समन्वयक डॉ. प्रदीप झिलपिलवार यांच्या पुढाकाराने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाला ‘‘बी’’ ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. एस. आर. वऱ्हाटे यांनी समाधान व्यक्त केले.