काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मोदी हावी
By Admin | Updated: June 29, 2016 02:27 IST2016-06-29T02:27:28+5:302016-06-29T02:27:28+5:30
काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे ...

काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मोदी हावी
प्रफुल्ल पटेल यांचा नागरी सत्कार : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
यवतमाळ : काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मंगळवारी यवतमाळात नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोहरराव नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे उपस्थित होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससह भाजपा व शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेसकडे जिल्हास्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यत नेतृत्वच नाही. तर सेना-भाजपा नेमके काय करीत आहेत, हे कळायला मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)